चंद्रपूर - शिवसेना व युवासेना तर्फे 80 टक्के सामाजिक कार्य करीत गरजूला व्हीलचेअर देण्यात आली.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी युवसेनेने दुर्गापूर येथील नेहा नगर ला राहणाऱ्या अशोक कापघाते ला ही व्हीलचेअर देण्यात आली.
कापघाते हे CTPS मध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते, वर्ष 2019 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला नी संसाराचा गाडा थांबला, त्यांना 2 वेळचं जेवण सुद्धा मिळणे कठीण झालं. Yuvasena Chandrapur
मात्र परिसरातील नागरिकांनी एकत्र येत त्यांना जेवण पुरवू लागले, मात्र अर्धांगवायूने घरी असलेले अशोक कापघाते यांना चालता येत नव्हते सदर बाब युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांना माहिती पडली असता त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात कापघाते यांना व्हीलचेअर देण्यात आली. News34 Chandrapur
यावेळी पवन नगराळे, अशोक चिरखरे, कमलाकर कुलमेथे, महेश मेश्राम व कार्यकर्ते उपस्थित होते.
