गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहर भाजपच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारत मातेचे पूजन करून ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.महिला आघाडीच्या नेत्या तथा समाजसेविका सौ.संगीताताई पातुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली.भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर, नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे,महादेव एकरे,महादेव जैस्वाल,हरीश घोरे, हरिभाऊ मोरे,कृष्णा भागवत,वामन आत्राम, संदीप शेरकी,अरविंद कोरे,बबलू रासेकर, विठ्ठलराव दाते,सुधाकर बोरीकर, प्रतीक सदनपवार, राजू बोगावार, गजानन चिरडे, विलास क्षीरसागर,गणपत बुरडकर,अज़ीम बेग,इम्रान शेख,मनोज लांडे, आकाश ताडे, मनोज डोंगरे,अनुज उमरे,अनील भगत, न.प.माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे, सौ.सपनाताई सेलोकर,निताताई क्षीरसागर, सौ.किरण उईके,सौ.संगीता गोरडवार इत्यादी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या शुभप्रसंगी माजी नगरसेवक नीलेश ताजने यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन कृष्णा वायकर यांनी तर आभार नगरसेवक अरविंद डोहे यांनी मानले.
