ब्रह्मपुरी - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोसिखुर्द प्रकल्पाची पाहणी केली, मागील 35 वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेलाच आहे.
शासनाकडून नियोजित ह्या दौऱ्याची माहिती चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना दिली नाही.
त्यांच्या विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांचा प्रकल्प पाहणी कार्यक्रम होत असला तरी त्यांना या कार्यक्रमाचे साधे निमंत्रण सुद्धा नव्हते, जिल्ह्याचं राजकारण हे विरोधाभासाचे असल्याचे त्यांनी आज एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. (MLA Bhangadiya is not invited to Chief Minister Thackeray's program)
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल स्थानिक आमदारांना अंधारात ठेवण्यात आले, याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी सरळ शब्दात सांगितले की आपण समजू शकतात आपल्याला याबद्दल माहिती का देण्यात आली नाही. जर मला याबाबत माहिती दिली असती तर शेतकऱ्यांचे माझ्या विधानसभा क्षेत्रातील समस्या मुख्यमंत्री यांच्यासमोर मी मांडल्या असत्या मात्र जाणूनबुजून मला ह्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले.
आमदार भांगडीया यांचा आरोप हा थेट पालकमंत्री वडेट्टीवार यांच्यावर होता.
मात्र नियमानुसार स्थानिक आमदारांना तिथे बोलावणे गरजेचे होते.
