गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन २०१९,२० या आर्थिक वर्षात अनेक लाभार्थी निवडून घरकुल बांधकामाच्या सूचना देण्यात आल्या.यामुळे लाभार्थ्यांनी बांधकामाला सुरूवात केली.काहींचे बांधकाम जोता लेव्हल,काहींचे स्लॅब लेव्हल तर काहींनी पैशांची जुळवाजुळव करून कसेबसे बांधकाम पूर्ण केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.असे असताना कोरपना येथील अंदाजे १२५ च्यावर घरांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे मात्र निधी अभावी घरांचे बांधकाम रखडले.काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला तर काहींचे निधी अभावी काम रखडल्याने निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. (Korpana Nagar panchayat)
सदर बाब नगरपंचातीच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा चर्चिला गेल्याची माहिती देण्यात आली आहे.शासनातर्फे निधी उपलब्ध न झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी पाहिलेले घराचे स्वप्नं पूर्णत्वास आले नाही अशी परिस्थिती असून सदर बाब लक्षात घेऊन कोरपना येथील नगरसेवक सुहेल अली यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे,चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले.कोरपना येथील लाभार्थ्यांचे देयके देण्यासाठी संबंधितांना निर्देश देऊन तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.परिणामी कोरपना येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल निधींचा प्रश्न मार्गी लागला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.तसेच जिवती येथील ६०० पेक्षा अधिक लाभार्थी पात्र असताना सदर योजनेच्या लाभापासून वन विभागाच्या परवानगीची अट,वन कायद्यामुळे बांधकाम रखडल्याचे सुद्धा नगरसेवक अली यांनी निदर्शनास आणून दिले. (Construction of Pradhan Mantri Awas Yojana stalled?)
यावर सकारात्मक प्रयत्न करून लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सैय्यद आबीद अली,संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष कैलास राठोड,नगरसेवक सुहेल अली,नगरसेवक अमर राठोड आवास योजनेचा प्रश्न सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
