ताजी बातमी - राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपन्न होत आहे, 15 जानेवारीला मतदान असून प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी उमेदवार मतदारपर्यंत पोहचून सेटिंग करण्यात फिरत आहे.
मागील 8 दिवसांपासून सुरू असलेला प्रचार कार्यक्रम थांबला असला तरी "कत्तल की रात"चा एक दिवस अजूनही बाकी आहे.
राजकीय पक्षांनी आपले पॅनल उभे केले आहे, आम्ही गावचा विकास कसा करू शकतो, यावर सर्वांनी भर दिला. Gram Panchayat Election chandrapur district
उमेदवारांची आई, बहीण, बायको यांनी सुद्धा प्रचारात आघाडी घेतली असून काही ठिकाणी स्वतः आपले नशीब अजमावताना दिसत आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला. अनेकांनी भावकीतल्या लोकांची भेट घेऊन मतदान करण्याचीही विनंती केली. Candidate setting continues
चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप चांगली मेहनत घेत असली तरी राष्ट्रवादी, कांग्रेस व शिवसेना सुद्धा यंदा चांगलीच रंगात आली आहे.
भाजपतर्फे आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहिर, शिवसेनेतर्फे संपर्क मंत्री एकनाथ शिंदे, प्रशांत कदम, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैध, कांग्रेस कडून प्रकाश देवतळे प्रचाराची धुरा सांभाळत असले तरी खासदार व पालकमंत्री यामध्ये दिसेनासे झाले होते.
आता प्रचार संपल्याने आजपासून उद्या रात्री उशिरापर्यंत गावातील गट, मंडळ आणि तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी सेटिंग्ज सुरू होणार आहे. त्यात या उमेदवारांना कितपत यश आलंय हे निकालाच्या दिवशीच समजून येणार आहे. येत्या 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. News34 chandrapur
