यवतमाळ - राज्यात बर्ड फ्लूचे सावट आल्याने मांसाहारी शौकिनांनी आपला मोर्चा मटनाकडे वळविला आहे, अंडी व चिकन वर ताव मारणे बर्ड फ्लू ने कमी केल्याने नागरिक मटणाच्या दुकानात गर्दी करू लागले आहेत. Determine the rate of mutton
मात्र मटण विक्रेते या बर्ड फ्लू च्या पडद्याआड मटणाचे दर वाढवून नागरिकांना लूटत आहे, यवतमाळ शहरात कोल्हापूर पॅटर्न राबवित मटणाचे दर निश्चित करण्याची मागणी स्वाभिमानी कामगार संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
शेतकरी आणि बचत गट यांच्या कडून कमी दरात बोकड खरेदी करून मटण मात्र अव्वाच्या सव्वा दर म्हणजे 700 ते 800 रुपये किलोने विक्री केली जात आहे. मटण खाणाऱ्या ग्राहकांची लूट थांबवावी अशी मागणी मटण प्रेमींनी केली आहे.
कोल्हापूरच्या धर्तीवर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मटणाचे दर नियंत्रित करावेत, अशी मागणी स्वाभिमान कामगार संघटेनेचे निरज वाघमारे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मटणप्रेमी आणि स्वाभिमान कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. Implement Kolhapur pattern at Yavatmal यवतमाळ मध्ये 800 रुपयांना 1 किलो या प्रमाणे मटण विक्रेते मटण विक्री करत असून सामान्य ग्राहकाची ही लूट आहे त्यामुळे लूट थांबवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. News34 chandrapur
