राजुरा - विदर्भातील नागपूर जिल्ह्यात असलेल्या गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालय राज्य शासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यामुळे संतप्त गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने विदर्भ तेलंगणा राज्य सीमेवरील लक्कडकोट येथेचक्काजाम चक्काजाम आंदोलन करून विरोध दर्शविण्यात आला असून गोंडवाना प्राणी संग्रहालय करण्याची मागणी दिनांक 26 जानेवारीला चक्काजाम करून करण्यात आली.
प्राणी संग्रहालय हे मध्य भारतातील गोंडवाना भूमी असलेल्या विदर्भातील नागपूर जिल्ह्यात आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात या क्षेत्रात गोंड राज्याचे साम्राज्य होते. Gorewada zoo nagpur
नागपूर या ऐतिहासिक शहराची स्थापना 300 वर्षापूर्वी गोंड राजे बक्त बुलंद शाह यांनी केले होते. या भागात या भागात आजही मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमाती समूहाची लोकसंख्या असून या भूमीला गोंडवाना लँड या नावाने ओळखले जाते.
गोरेवाडा प्राणी संग्रहालयास गोंडवाना हे नाव देण्याची मागणी विदर्भातील लोकांनी फार पूर्वीपासून केलेली आहे व आजही करीत आहे. मात्र या मागणीला डावलून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याने आदिवासी समाजात असंतोष पसरला आहे.त्या अनुषंगाने गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने लक्कडकोट राज्य सीमेवर चक्काजाम आंदोलन मा अब्दुल जमीर अब्दुल हमीद जिल्हा उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी तसेच राजे संजय आत्राम, किसन मोकाशी, राजे केशव राव आत्राम, गुलाब आरके, वसंत आत्राम,जैतु कुलसंगे माजी सरपंच, संतोष,आत्राम गुलाब,सुभाष मडावी,राजेश मेश्राम, विष्णू घुले,व मोठ्या संख्येत चक्काजाम आंदोलनात असलेल्या आदिवासी लोकांनी केली आहे.
