गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना नगरपंचायतचे दिवंगत नगरसेवक स्व.अशोक डोहे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्य ७ जानेवारी रोजी "स्व.अशोक भाऊ डोहे मित्र मंडळ कोरपना" यांच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालय येथे रूग्णांना फळ वाटप,नगरपंचायतचे सफाई दूतांचा सत्कार तसेच ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.राज कॉनव्हेन्ट येथे श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. (Korpana Nagar panchayat)
अध्यक्षस्थानी माजी आमदार अँड.संजय धोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार सुदर्शन निमकर,विवेक बोढे,सैय्यद आबीद अली, किशोर बावणे,रमेश पाटील मालेकर,उत्तम मोहितकर,कडॉ.भास्कर मुसळे,अरविंद मसे, नगरसेवक सुभाष तुराणकर,अँड.श्रीनिवास मुसळे,गडचांदूरचे न.प.नगरसेवक अरूण डोहे, प्रा.संजय ठावरी,पुंडलीक उलमाले,अनील रेगुंडावार, विजय रणदिवे,अरूण मडावी,विनोद नवले,पुरुषोत्तम भोंगळे,ओम पवार, गडचांदूर न.प.च्या माजी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे,इंदिराताई कोल्हे, अल्काताई रणदिवे,जयाताई धारणकार आदी मान्यवर तसेच यावेळी मोहबत खान,नदीम भाई,गीता डोहे,सत्यवान घोटेकर, मारोती मोडक,सुनील देरकर, पुसाराम डोंगे, सुधाकर कारेकर,अरविंद कारेकर,शंकर चिंतलवार, नजी़र खान, मनोहर दुरटकर,सुधाकर मोडक,अनिल कौरासे,जीतेंद्र पिंपळकर,सुभाष आत्राम, राजू लांडगे,अभय डोहे,पुंडलीक कारेकर, फकरू लोडे,पद्माकर दगडी,मंगेश कळस्कर, सुभाष हरबळे,माधव डोहे, संदीप टोंगे,संजय टोंगे,मारोती डोंगे, गणेश तुरणकार, गणेश मालेकर,विवेक पारखी यांची उपस्थिती होती.संचालन विजय पानघाटे, प्रास्ताविक नगरसेवक अमोल आसेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्व.अशोक भाऊ डोहे मित्र मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
