चंद्रपूर - महानगरपालिकेतील ६५ नाली सफाई कामगारांपैकी केवळ ३५ कामगारांना कामावर घेण्यात आले आहे. त्यामूळे उर्वरीत नाली सफाई कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यामूळे या सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. (Young Chanda Brigade)
मनपा कडे नाली सफाईच्या कामाकरीता ६५ कंत्राटी कामगार आहे. गरजेनूसार या कामगारांचा वापर केल्या जातो. कोरोनाकाळत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी या सर्व कामगारांनी आपले कर्तव्य बजावले मात्र आता यातील केवळ ३५ कामगारांनाच कामासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी ३० कामगार बेरोजगार झाले आहे. मागील तिन महिण्यांपासून हे कामगार बेरोजगार असल्यामूळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्या पूढे निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेण्यात आली असून सदर बेरोजगार कामगांना काम देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील घाण काढून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या कामगारांवर अन्याय करणे योग्य नसुन त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनीही रोटेशन पध्दतीने या कामगारांना काम देण्याचे मान्य केले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, अल्पसंख्याक विभागाचे शहर संघटक सलीम शेख, महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, करणसिंह बैस, राहूल मोहुर्ले, दूर्गा वैरागडे, यांच्यासह नाली सफाई कामगारांची उपस्थिती होती.