प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - 7 जानेवारीला घुगूस शहरात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत मध्ये कार्यरत महिला सफाई कामगार व सुशिक्षित महिलांचा शाल व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. (BRSP GHUGUS)
सत्कार कार्यक्रमाला विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष एड. भुपेंद्र रायपुरे, जिल्हाध्यक्ष जेडी रामटेके, जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी, विधानसभा उपाध्यक्ष योगेश नगराळे, घुगूस शहर अध्यक्ष शरद पाईकराव, माया सांड्रावार, रमा सातरडे आदींची उपस्थिती होती.
उपस्थित पाहुण्यांच्या वतीने महिला सफाई कामगारांचा शाल व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला, आयोजित कार्यक्रमात असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
