चंद्रपूर.-दिव्यांग व्यक्तीस दररोज ये जा करण्याकरिता अनेक त्रासांचा सामना करावा लागतो त्याची गरज लक्षात घेता लोकसहभागातून स्थानिक विकलांग सेवा संस्था सभागृहात अलीकडेच 3 दिव्यांग व्यक्तींना वस्त्रे उपलब्ध करण्यात आली असून एका दिव्यांग बांधवाला व्हील चेअरचे वितरण चंद्रपुरातील जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते विनोद दत्तात्रय यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी नगराध्यक्ष व विद्यमान मनपा चंद्रपूर नगरसेविका सुनीता लोढिया यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. News34 Chandrapur
याप्रसंगी परिसरातील स्वछता दूत यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला सीमा ठाकूर यांनी विशेष सहकार्य दिले.यावेळी कार्यक्रमाला रंजना नाकतोडे,बबिता अग्रवाल, सीमा वनकर प्रसाद पान्हेरकर ,पूजा चहारे,पूजा राखोंडे ,संगीता ठोसरे, देवराव कोंडेकर, अशोक खाडे, मानवाधिकार कार्यकर्ते बंडू पहानपटे आदींची उपस्थिती लाभली होती.
