चंद्रपूर - पर्यावरण मंत्री मा. आदित्य साहेब ठाकरे, युवासेना राज्य कार्यकारीणी सदस्य रूपेश दादा कदम, युवासेना जिल्हा विस्तारक त्रिपाठी साहेब, जिल्हाप्रमुख संदिपजी गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.निलेश बेलखेडे, शहरप्रमुख अक्षय अंबिरवार यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. स्थानिक विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथे चांगली रविंद्रनाथजी टागोर मराठी प्राथमिक शाळा असून काही वर्षांपासून पटसंख्या नसल्यामुळे हि शाळा बंद असून विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष च झालेले आहेत एक वेळ अशी होती की या शाळेत परिसरातील सर्व प्रभागाचे विद्यार्थी शिकण्यासाठी धडपड करायचे परंतु काँन्व्हेट संस्कृती विचारसरणी मुळे आज अत्यंत वाईट परिस्थिती मराठी शाळेवर आेढावली असल्याने हि शाळा बंद झाल्यातच आहे त्यामुळे आयुक्तांना विनंती करण्यात आली कि एक तर हि शाळा पुर्वरत सुरू करून विषेश लक्ष देऊन विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करून पुन्हा हि शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी अन्यथा या शाळेत थोर विचारवंत,लेखक, कवी रविंद्रनाथजी टागोर यांच्या नावाने येथे सुंदर ग्रंथालय, वाचनालय व मोफत अभ्यासिका सुरू करण्यात यावी जेने करून प्रभागातील कित्येक विद्यार्थ्यांना घडविणार्या एकेकाळच्या शिक्षणाच्या या माहेर घरात येथील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता व्यासपीठ मिळेल. Yuvasena Chandrapur
दिलेल्या निवेदनावर विचार करून येत्या काही महिन्यातच निर्णय घेऊ असे यावेळी महानगर उपायुक्त मा. वाघ साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.निलेश बेलखेडे यांनी उपायुक्त यांच्याशी महानगरपालिका मराठी शाळेच्या तसेच महानगरपालिका अंतर्गत इतर शाळेच्या विकासासाठी,दैनंदिन अभ्यासक्रम बरोबरच विद्यार्थ्यांनाच्या व्यक्तीमत्व विकास,कौशल्य विकास कसा करण्यात येईल जेनेकरून पालकांचा विश्वास संपादन करून महानगरपालिका शाळेबद्दल पुन्हा एकदा आपुलकी निर्माण होईल व ते आपल्या पाल्यांना महागड्या काँन्व्हेट मध्ये नाही तर महानगरपालिका शाळेत शिकविण्यासाठी प्राधान्य देईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. तसेच शहरात प्रत्येक प्रभागात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असायला हव्या यासाठी प्रयत्न करावे अशी सुद्धा विनंती यावेळी करण्यात आली. News34 Chandrapur यावेळी उपायुक्त वाघ साहेब यांच्या कोरोना मुळे स्थगिती असलेल्या समोर होणार्या महानगरपालिका शाळेच्या विकासाबद्दल सकारात्मक भूमिकेबद्दल प्रशंसा व्यक्त करण्यात आले.यावेळी जिजाऊ माता ग्रुप च्या प्रगती पडगेलवार, जास्मीन शेख,गणेश काळे, संकेत वांढरे, प्रियन बोरकुटे, किशोर देशमुख, प्रज्वल गर्गेलवार, वैशाली पिल्लेवाड, अमोल पडगेलवार, पप्पू पडगेलवार, गोदा दुरसेलवार, राकेश थोरात, जितू भाऊ, अंकुश जिझीलवार, बंटी लडके, मंथन वसाड, संदेश गरपल्लीवार, ऋषिकेश दुडरे,प्रथम तपासे, सुरज शास्त्रकार, सघू दुर्षेलवार, वैभव पडगेलवार, अंकित टेकूलवार, अक्षय पडगेलवार तसेच वॉर्डातील स्थानिक युवक, विद्यार्थी उपस्थित होते.
