वरोरा - पोलीस स्टेशन वरोरा परिसरात दि. 20/01/21 रोजी गुन्हे प्रगटीकरण पथक हे पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की नेहरू चौक वरोरा येथील अनाज लाईन मध्ये तास पत्यावर जुगाराचे खेळ चालू आहे या माहितीवर पथक प्रमुख पोनी दीपक खोब्रागडे, यांचे मार्गदर्शनात पोउपनी सर्वेश बेलसरे, सफो विलास बलकी, नापोशी किशोर बोढे, पोशी कपिल भंडारवार, विशाल गिमेकर, दिनेश मेश्राम, सुरज मेश्राम, महेश बोलगोडवार यांनी सापळा रचून अत्यंत हुशारीने व चलाखीने जुगार खेळणारे 10 आरोपी यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून जुगाराचा मुद्देमाल एकूण 6120 रु जप्त करून कारवाही करण्यात आली. सदर कारवाईमुळे
वरोरा परिसरात शांतता पूर्वक वातावरण निर्माण झाले आहे. News34 Chandrapur
