चंद्रपूर - स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणारे Mahatma Gandhi यांची आज पुण्यतिथी. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होत जनसेवा करण्याची इच्छा असलेल्या गांधीजींची 30 जानेवारी 1948 रोजी नथूराम गोडसे यांनी हत्या केली. आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे व्रत जपणाऱ्या गांधीजींचा अंत हत्येने झाला.
देशातील अत्यंत गरीब जनेतला इंग्लंडच्या सामर्थ्याशी लढा देण्यास गांधीजींकडे कोणतेही शस्त्र नव्हते. अशा भारतीय जनतेला सत्याग्रहासारखे विलक्षण शस्त्र महात्मा गांधीजींनी दिले. यामुळे या लढाईत पुरुष, स्त्रिया, मुले सर्वच सामील झाले. छोडो भारत, चले जाव, करेंगे या मरेंगे या गांधींजींच्या घोषणांंनी देश पेटवून उठला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र्य भारताचे स्वप्न साकार झाले.
आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ चंद्रपूर महिला काँग्रेस च्या वतीने जटपुरा गेट येथील गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
ज्याप्रमाणे अहिंसेचा मार्ग दाखविणारे महात्मा गांधी यांची निर्घृणपणे हत्या झाली त्याचप्रमाणे आज देशात लोकशाहीची हत्या रोज करण्यात येत आहे, शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नाही हे आंदोलन तुमचं तख्त पलटविण्याची ताकद ठेवणार अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र महिला कांग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली.
यावेळी जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस च्या अध्यक्षा चित्रा ताई डांगे, महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा सुनीता ताई अग्रवाल, उपाध्यक्ष सुनीता धोटे, उपाध्यक्ष एकता गुरले, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, अनुसूचित महिला काँग्रेस शहर अध्यक्षा अनु दहेगावकर, सुनंदा धोबे, माजी सभापती हर्षा चांदेकर, इंदिरा चोपकर कल्पना गिरडकर वंदना वाढईअरुणा मरसकोल्हे प्रिया चंदेल परवीन साययद, वंदना भागवत,अनिता दातार,अनिता मेश्राम, माया पहानपटे, तस्लिम शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
