चंद्रपूर - गुरुवार 7 जानेवारीला गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने 5 लाख रुपयांची अवैध दारू पकडत 3 आरोपींना अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार एका चारचाकी वाहनातून दारू तस्करी होणार आहे, या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत चारचाकी वाहन MH 46 N4003 या वाहनाला रामनगर ठाण्याच्या हद्दीत थांबवून चौकशी केली असता वाहनात 35 बॉक्स ऑफिसर्स चॉईस कंपनीची विदेशी दारू एकूण किंमत 5 लाख 4 हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली. (Chandrapur Local Crime Branch)
सदर कारवाईत एकूण 3 आरोपी आकाश हरणे, सौरभ कुदारकार, पवन धुडे सर्व राहणार वर्धा यांना अटक करून एकूण 10 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गदादे, संजय आतकुलवार, अमजद खान, प्रशांत नागोसे यांनी यशस्वी केली.
