चंद्रपूर - 40 हजार रुपयांच्या खंडणी प्रकरणी अशोक मत्ते यांना अटक करण्यात आली, RTO अधिकाऱ्यांना धमकावून मला महिन्याचे पैसे द्या अन्यथा तुमच्या विभागाची चौकशी ANTI CORRUPTION BEURO मार्फत लावू मात्र अधिकाऱ्यांनी मत्ते च्या धमकीला न जुमानता जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांच्याकडे तक्रार केली.
सापळा रचून मत्ते यांना पोलिसांनी अटक केली, हा मत्ते कोण याचे राजकीय नेत्यांशी संबंध काय असे अनेक विचार आपल्या मनात येत असतीलच.
मत्ते यांचे कांग्रेस नेत्यांशी घट्ट संबंध आहे, विशेष म्हणजे खासदार साहेबांचे अगदी जवळचे.
कोरोना काळात पहिल्यांदा दारूचे दुकान सुरू करण्यात आले त्यावेळी या मत्ते नी वणी मधून दारूच्या 4 ते 5 पेट्या गाडीत टाकून आणले होते, त्याची व्हिडीओ रेकॉर्डिंग सार्वजनिक झाली होती मात्र मत्तेवर त्यावेळी कसलीही कारवाई करण्यात आली नाही.
नेत्यांच्या नावाने कुणालाही धमकी द्यायची व पैसे उकळायचे हा नेहमीचा धंदा बनून गेला. कांग्रेस नेत्यांचे वाढदिवस असो की नियुक्ती शहरात मोठे बॅनर लावून त्यांना शुभेच्छा मात्र मत्ते जरूर द्यायचे.
पडोली येथे मत्ते यांचं फार्म हाऊस आहे, तिथे नेहमीचं कांग्रेस नेते जमून वाढदिवसाची पार्टी करायचे, म्हणजे नेत्यांशी लगटपणा असल्याने ते असे आयोजन करायचे तसे फोटो मत्ते यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर आहेच.
काही पैसे कमविण्यासाठी नेत्यांचा नावाचा उपयोग करून गावात दहशत माजवण्याचं काम मत्ते द्वारा करण्यात येत आहे मात्र त्यांच्या अटकेनंतर अनेकजण म्हणतात की बरं झालं अटक झाली.
नेत्यांचे नाव सांगून वसुली करणे म्हणजे नेता त्यांना सांगतो की असे नाही, मत्ते यांची हिंमत वाढली होती याबाबत नेत्यांना काही माहीत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
ते आमदार असो की खासदार मात्र मत्ते यांच्या अटकेने कांग्रेस पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात ढासळली.
