बल्लारपूर: महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर, येथे एन.सी.सी. व सैन्य विज्ञान विभागा तर्फे तसेच एन. सी. सी. कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय भास्कर व ऍडम ऑफिसर गौस बेग यांच्या मार्गदर्शनाखाली 15 जानेवारी ला "73 वा थलसेना दिवस" साजरा करण्यात आला. Celebration of '73th Army Day
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. नंदकिशोर कुमार सेवानिवृत्त प्रा. एनडीए खडकवासला, हे पुणे वरून फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून ऑनलाईन जुळून एन.सी.सी. च्या कॅडेट्स ला संबोधले यांनी कॅडेट्स ला मार्गदर्शन करताना भारतीय सेना व त्यानंची उत्कृष्ट परंपरा त्याचं बरोबर भारतीय सेने चे रण कौशल्य आणि पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धा वर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाचे चे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य सौ. ज्योती भुते उपस्थित होते. News34 Chandrapur
यावेळी डॉ. कावरे, प्रा. बोबडे, प्रा. पटवर्धन मॅडम, प्रा. कवाडे, उपस्थित होते. सूत्रसंचालन एन.सी.सी. ऑफिसर प्रा. योगेश टेकाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिनिअर कॅडेट बरखा यादव यांनी केले.
