प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - शहरातील रामनगर वेकोली वसाहती मध्ये राहणारे वेकोली कर्मचारी दिलीप फुटाणे यांचा 25 वर्षीय मुलगा शुभम फुटाणे हा रात्री बेपत्ता झाला असल्याची तक्रार घुगूस पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे.
रविवारी सायंकाळी शुभम हा मित्राकडे जात असल्याचे सांगत घराबाहेर निघाला मात्र रात्री तो घरी परत न आल्याने फुटाणे परिवार अस्वस्थ झाला होता. Kidnapping of 25-year-old boy at Ghugus
काही वेळा दरम्यान शुभम च्या मोबाईल मधून फुटाणे यांना कॉल आला समोरून कुणीतरी अज्ञाताने त्यांना तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, मुलगा हवा असेल तर आम्हाला 30 लाख रुपये द्या अन्यथा आम्ही काही बरेवाईट करू अशी धमकी देण्यात आली. News34 Chandrapur
फुटाणे कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार घुगूस पोलीस स्टेशनला दाखल केली असता पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या नेतृत्वात सपोनि मेघा गोखरे यांनी तपास सुरू केला.
प्रकरण गंभीर असल्याचे बघता स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे फुटाणे यांच्या घरी दाखल होत तपासाला अधिक गती देत तात्काळ या प्रकरणामागे काय दडलंय याची माहिती घेत आहे. काही वेळात जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे सुद्धा घुगूसला पोहचणार आहे.
मागील वर्षी सुद्धा शहरातील अल्पवयीन बालकाचे अपहरण करण्यात आले होते मात्र आरोपीने माणुसकी दाखवीत बालकाला सुखरूप सोडले होते. ransom demand of Rs 30 lakh
बालक सुखरूप मिळाल्याने घरच्या व्यक्तींनी सुद्धा गुन्हा मागे घेतला होता.
मात्र हे प्रकरण जरा वेगळंच असण्याची शक्यता दर्शविण्यात येत आहे.
