प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यात 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान पार पडले, काही ठिकाणी चांगलाच गोंधळ माजला तर काही ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.मात्र घुगूस येथील बेलसनी गावात मतदानाच्या दिवशी अजबच प्रकार समोर आला. Attempted suicide in ghugus
बेलसनी येथील उमेदवार मंगेश लोंढे यांनी गावातील वामन झाडे याला मत दिल नाही म्हणून धमकी देत "तू गावात राहतो तरी कसा" दम दिला.
मात्र हा दम मंगेश लोंढे याला चांगलाच भारी पडला, धमकीने वामन झाडे हा इसम चांगलाच घाबरला व कसलाही विचार न करता त्याने किटनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. NEWS 34 Chandrapur
झाडे यांनी किटनाशक पिल्याचे गावातील नागरिकांना निदर्शनास आले त्यांनी तात्काळ झाडे यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला तात्काळ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
झाडे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, प्रकरण अंगावर येत असल्याचे बघताच उलट लोंढे यांनी झाडेविरुद्ध तक्रार द्यायला घुगूस पोलीस स्टेशनला पोहचले.
आता पोलीस या प्रकरणात कुणावर काय कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
