चंद्रपूर - बहुजन समाज पार्टी चंद्रपूर विधानसभा, चंद्रपूर शहर, घुगुस शहराच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष परम आदरणीय बहन कु.मायावती जी यांचा 65 वा वाढदिवस ,आर्थिक सहयोग दिवस तथा जनकल्याणकारी दिवस मृणाल गिरी सेलिब्रेशन हॉल खोब्रगडे कॉम्प्लेक्स चंद्रपूर येथे साजरा करण्यात आला. Bahujan Samaj Party Chandrapur
यावेळी चंद्रकांत मांझी साहेब (प्रदेश सचिव तथा जिल्हा इन्चार्ज), अनिल रामटेके (बसपा गटनेता महानगरपालिका चंद्रपूर), मुकद्दर मेश्राम (जिल्हा अध्यक्ष), मनीषा नैताम ( जिल्हा संयोजिका), धर्मेश निकोसे (जिल्हा कार्यकारी सदस्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिरीजकुमार गोगुलवार (शहराध्यक्ष, चंद्रपूर) यांच्या नेतृत्वात इतर राजकीय पक्षातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे मारवाडी समाजातल्या जय बजाज यांनी नुकताच दीक्षा भूमी चंद्रपूर इथे बौद्ध धर्म स्वीकारला आणि राजकीय पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टी मध्ये प्रवेश केला. BSP SUPRIMO MAYAWATI
याप्रसंगी चंद्रपूर विधानसभा प्रभारी संजय मेश्राम , विधानसभा अध्यक्ष संजय खोब्रगडे, सागर वरघणे (शहर महासचिव) ,शरद दुर्गे (वॉर्ड अध्यक्ष) ,सागर करमरकर (वार्ड अध्यक्ष),राहुल कामटे (वार्ड अध्यक्ष)दुर्गेश शर्मा, यश पेन्द्रे, जयेश वेले, रोशन किनगांवकर, रोहित पवार, निशांत शेंन्डे, निकेश मेश्राम, सुरज हीरेमठ, बंटी गलगट, सुरजीत सिंह गलगट,दिनेश शेगमवार, वीरेंद्र प्रजापति यांची विशेष उपस्थिती होती. NEWS34 CHANDRAPUR
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा महासचिव प्रभुदास जी पुणेकर, सूत्रसंचालन साखरकर सर, तर आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष प्रशांत रामटेके जन यांनी केला. या कार्यक्रमात विधानसभा चंद्रपूर शहर, व घुघुस शहरताले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
