चिमूर - तालुक्यातील मोठेगाव येथील जिल्हापरिषद शाळेतील बूथ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिस व नागरिक यांच्यात धकाबुक्की झाली होती याच दरम्यान पोलिसांनी नागरिकांना मारहाण केली तर नागरिकांनीही पोलिसांवर हात उचलून मारहाण केल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शीनी दिली त्यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रकारामुळे मोठेगावात पोलिसांची जादा कुमक बोलाविण्यात आली त्यामुळे गावात पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. Fighting between police and voters in Chimur
पोलिसांनी मोठेगाव येथील मयूर पुरुषोत्तम दडमल वय 35 वर्ष,भगवान गुप्तराज रामटेके 40 वर्षे, रविंद्र गुणाजी खोब्रागडे वय 37 यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र तिन ही व्यक्ती ग्रामपंचायत मतदानापासून वंचीत राहील्याचे बोलले जात आहे. News34 chandrapur
आंबोली मतदान केंद्रावर दोन गटात वाद शंकरपूर येथून जवळ असलेल्या आंबोली येथे जिल्हा परिषद शाळे मध्ये बूथ आहे या बूथ केंद्राच्या समोर उमेदवार माझी सरपंच रवी ठाकरे व मतदार मध्ये शाब्दीक वाद झाला ही माहिती शंकरपूर येथील पोलीस चॉकी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे पोलीस कर्मचारी तसेच दंगा पथक घटनास्थळी दाखल झाले सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून माझी सरपंच रवी ठाकरे प्रशांत मोरे व इतर एक व्यक्तीला भिसी पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहे वृत्त लिहिपर्यंत गुन्हा नोंद झाला नाही.
जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी पोलीस दल कर्मचाऱ्यासाहित संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली.
