चंद्रपूर - संस्कार भारती चंद्रपूरच्या वतीने रविवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी चंद्रपूर जिल्हा स्तरीय भक्तीगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Sanskar Bharati Chandrapur
चंद्रपूरातील हॉस्पीटल वार्ड परिसरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय सभागृहात आयोजित ही जिल्हास्तरीय भक्तीगीत गायन स्पर्धा सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. चंद्रपूर जिल्हयातील गायक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होवू शकतील. वय वर्षे 10 ते पुढे अशी खुल्या गटयाकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या चंद्रपूर शहरातील तसेच बाहेरील स्पर्धकांनी व त्यांच्यासोबत येणा-या व्यक्तींनी येण्याजाण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतःच करणे अपेक्षित आहे. भक्तीगीत हे मराठी व हिन्दी भाषेतील अभंग, भजन, चित्रपट गीत कोणत्याही प्रकारचे असावे, फक्त त्याचा भाव हा भक्तीचा असणे आवश्यक आहे. सादरीकरण 4 मिनीटांपेक्षा जास्त नसावे. गीत वैयक्तीकरित्या सादर करणे बंधनकारक आहे. स्पर्धकांना हार्मोनियम व तबला या वादयांचा वापर करणे बंधनकारक असून अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वादयांचा वापर करता येणार नाही. वादकांची व्यवस्था आयोजकांनी केली असून स्पर्धक स्वतःचे वादक सोबत आणू शकतील.
organizes district level devotional singing competition
स्पर्धेचे प्रवेश शुल्क 200/- रूपये असून ते गुगल पे च्या माध्यमातुन दिनांक 5/2/2021 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने 9404578720 या मोबाईल नंबरवर पाठवावे. नाव नोंदणी करिता मंगेश देऊरकर (9850360875), प्रविण ढगे (9595519141), लिलेश बरदाळकर (9960231410), राज ताटपल्लीवार (7620421461) यांच्याशी संपर्क साधावा. नोंदणी केल्यानंतर व प्रवेश शुल्क भरल्यानंतर स्पर्धकांना एक गुगल लिंक फॉर्म पाठविण्यात येईल त्यात स्पर्धकांना त्यांची माहिती भरून सबमिट करावी लागेल. स्पर्धा संपल्यानंतर लगेच पारितोषीक वितरण संपन्न होईल. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला 5000/- रू. रोख व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकाला 3000/- रू. रोख व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकाला 2000/- रू. रोख व 1000/- रू. रोख किंमतीची दोन प्रोत्साहनपर पारितोषीके प्रदान करण्यात येतील. News34 Chandrapur
या जिल्हास्तरीय भक्तीगीत स्पर्धेत जिल्हयातील स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्कार भारती चंद्रपूरतर्फे करण्यात आले आहे.
