वरोरा :-प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नामदार बच्चू कडू यांच्या आदेशाने नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र गजु कुबडे यांच्या अध्यक्षतेखाली वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक 30 नोव्हेंबर रोज सोमवारला वरोरा येथील जुने नगरपरिषद हॉल मध्ये संपन्न झाली .
प्रहारचे संस्थापक नामदार कडु यांच्या अध्यक्षतेखाली खाली 17 नोव्हेंबर ला नागपूर येथे संपन्न झालेल्या पूर्व विदर्भाच्या बैठकीत गजु कुबडे यांची चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली .जिल्हा कार्यकारणी व पक्षवाढी संदर्भात पक्षाप्रमुखाने दिलेल्या आदेशानुसार कुबडे यांनी 28 नोव्हेंबर पासून जिल्हा दौरा सुरू केला असून .चिमूर , नागभीड, चंद्रपूर , बल्लारपूर , गडचांदूर , व या दौऱ्याचा समारोप वरोरा येथे करण्यात आला .त्या निमित्ताने आढावा बैठक व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला .या बैठकीदरम्यान अनेक नवीन कार्यकर्त्यांनी सेवा बंधन बांधून पक्ष प्रवेश केला .प्रत्येक तालुक्यात मिळालेला भरघोस प्रतिसाद बघता जिल्हा लवकरच प्रहारमय होईल व पुढील आठवड्यात जिल्ह्याची कार्यकारणी घोषित करण्यात येईल असे वक्तव्य त्यांनी मार्गदर्शन भाषणात केले .जिल्हात सर्वपरिचित असणारे कुबडे यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी आल्याने जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य बघायला मिळाले .यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगदीश लांडगे यांचा व त्यांच्या नेतृत्वात वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला. ,त्याच सोबत वरोरा तालुक्यातील सोनेगाव येथील सरपंच सुरेश कुत्तरमारे , चिनोरा येथील उपसरपंच महेंद्र बदकि,वरोरा शहरातील युवक शुभम नरडे यांचा व त्यांच्या सोबत अनेक युवकांनी पक्ष प्रवेश घेतला तर विद्यार्थी आघाडीत काम करण्याची इच्छा दर्शवित निखिल मांडवकर व त्याचे सहकारी यांनी ही प्रवेश घेतला .या बैठकीला वरोरा , भद्रावती तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहार सेवक आशिष घुमे , लिलेश ढवस , संदीप झाडे , नितीन नागरकर , विक्की तवाडे , किशोर डुकरे , शेरखान पठाण , गणेश उराडे , अक्षय बोदंगुलवार , प्रमोद देठे , मुज्जू शेख , ओंकार कांबळे , देवा पांडे, नितीन जुमडे , रमेश सनस यांनी अथक परिश्रम घेतले.
