चंद्रपूर - पद्मापूर येथे नविकरण बहुद्देशीय संस्थेच्या व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राच्या दुसऱ्या निवासी संकुलाचे उदघाटन डॉ. रिजिना शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला गेडाम, डॉ. ममता ठाकुरवार, भास्कर भगत, मारोती साव, डॉ. जितेंद्र खोब्रागडे व डॉ. वर्षा खोब्रागडे आदी होते.
मान्यवरांनी उपस्थितांना दारूचे दुष्परिणाम त्यापासून दूर कसे रहावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी जितेंद्र विरुटकर यांनी मानले तर आभार सचिव रुपाली गेडाम यांनी मानले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नविकिरण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दिगांबर गेडाम, सचिव रुपाली गेडाम यांनी अथक परिश्रम घेतले.
