नागपूर - जगभरात आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने दहशत माजवली असून देशात ब्रिटनवरून येणारे सर्व हवाई वाहतूक बंद करण्यात आली.
मात्र 29 नोव्हेंबर ला ब्रिटनवरून नागपूर व नंतर गोंदीयाला प्रवास केलेला तरुण पॉझिटिव्ह निघाल्याने विदर्भात धाकधूक निर्माण झाली होती.
त्या तरुणाला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित केले की काय असा प्रश्न उपस्थित झाला, मात्र त्या तरुणांची RT-PCR अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
कोरोनाचा नवा स्ट्रेन जगात वेगात पसरत आहे, पुन्हा लॉकडाऊन होणार का? अशी भीती नागरिकांना सतावीत असतांना ही दिलासादायक बातमी मिळाली असली तरी भीती संपलेली नाही कारण ब्रिटनवरून अनेक हवाई वाहतुकीद्वारे अनेक जण महाराष्ट्र मध्ये दाखल झाले आहे.
सध्या सर्वाचा तपशील मागवीत त्यांची चाचणी करण्याचे काम प्रशासन करीत आहे.
संबंधित तरुण हा 1 महिन्याआधी नागपूरला आला होता, 1 महिन्याचा कालावधी लोटल्याने तो आता बरा झाला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
