ताजी बातमी - कोरोना चाचणी दरामध्ये राज्य सरकारने सहाव्यांदा कपात केली आहे, आता मागील 980 रुपयाऐवजी नागरिकांना 700 रुपये द्यावे लागणार अशी घोषणा आरोग्यमंत्री टोपे यांनी केली.
राज्यात कोरोना बाधितांचा धोका अजून कमी झाला नसला तरी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कोविड चाचणीसाठी 4500 रुपये दर निश्चित केले होते मात्र राज्य शासनाने मोठी कपात करीत हे दर 700 रुपयांवर आणले.
कोरोना काळात बाधितांच्या कुटुंबावर आर्थिक बोझा पडू नये यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली असून त्यामार्फत बाधितांवर उपचार पूर्णपणे मोफत होणार असल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली.
