प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - घुग्घुस येथील भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हि नियुक्ती मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केली आहे.
नवनियुक्त भाजपा युवा मोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांनी मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या स्वप्नातला युवक घडवून भाजपा युवामोर्चाचे पक्ष संघटन घराघरात पोहचवुन पक्ष संघटनेचे कार्य करनार असा मानस व्यक्त केला.
मागील तिन वर्षापासून घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष पदाची यशस्वी धुरा विवेक बोढे यांनी सांभाळली आहे. घुग्घुस शहरात भाजपाचे पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य अनेक वर्षापासून त्यांनी केले व भाजपाला यश मिळवून दिले.
भाजपा युवा मोर्चाजिल्हा महामंत्री पदी श्री.विवेक बोढे यांची नियुक्ती होताच त्यांचावर शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
