ताजी बातमी - सध्या जग यशस्वीपणे कोरोनाशी लढा देत असताना पुन्हा नवीन डोकेदुखी जगासमोर उभी राहली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार आल्याने पुन्हा जग ठप्प होणार का? अशी चिंता सतावू लागली आहे.
,हा नवा अवतार अधिक घातक व संसर्गजन्य असल्याचे बोलले जात आहे.
आग्नेय ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा म्युटेशन सापडल्याने याचा प्रसार आधीच्या कोरोना विषाणू पेक्षा जास्त प्रमाणात होत आहे.
या नव्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटेन ने 16 डिसेंम्बरपासून लॉकडाऊन घोषित केला आहे.
हा नवा अवतार कुठून व कसा आला याबाबत अजूनही माहिती मिळाली नसली तरी या विषाणूने आतापर्यंत तब्बल 12 वेळा आपलं रूप बदललं आहे.
म्युटेशन म्हणजे वायरसच्या जेनेटिक सिक्वेन्समधला बदल. सार्स COV – 2 अर्थात कोरोना हा आरएनए वायरस आहे. त्याचे रेणू ज्या क्रमात रचलेले असतात त्या संरचनेत इथे बदल होतो.
या नव्या व्हायरसवरच्या स्पाइक प्रोटिनची रचना बदलेली आहे. या स्पाइक प्रोटिनद्वारे व्हायरस मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. हा 40 ते 70% जास्त संसर्गजन्य असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. शास्त्रज्ञांना अशीही भिती वाटते आहे, की कोट्यवधी लोकांनी लस घेतल्यानंतर अजूनच प्रभावीपणे रूप बदलण्यासाठी कोरोनाव्हायरस प्रवृत्त होऊ शकतो.
काही तज्ञांच्या मते, मात्र कोरोना किंवा कुठलाही व्हायरस रुप बदलत राहणारच. हे व्हायरस नष्ट होतील की तसेच जिवंत राहतील हे मानवी प्रतिकारशक्तीवर हे अवलंबून असेल. शिवाय म्युटेशनमध्ये स्पाइक प्रोटिनच्या संरचनेत एका विशिष्ट जागी बदल होतो आणि लस मात्र स्पाइक प्रोटिनच्या विविध भागांवर मारा करते, असंही काही तज्ञांचं मत आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला ब्रिटनच्या संशोधकांनी VUI-202012/01 असे नाव दिले आहे. हा विषाणू साखळी तयार करून संसर्ग वेगाने पसरवितो.
हा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सप्टेंबर महिन्यात आढळून आला होता आतापर्यंत या स्ट्रेनचे तब्बल 1100 नागरिकांना याची लागण झाली आहे.
या स्ट्रेनचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची भीती आहे कारण हा आधीच्या विषाणू पासून 70 पट अधिक वेगाने पसरतो.
महाराष्ट्र सरकारने तात्काळ खबरदारी घेत हवाई वाहतूक बंद केली, 31 डिसेंम्बरपर्यंत ही अंमलबजावणी कायम राहील, विमानतळावर जे ब्रिटनमधून येणारे नागरिक आहे त्याची RT PCR चाचणीं करण्यात येणार असून त्यांना 14 दिवसांसाठी सस्थांत्मक कोरेन्टाईन करण्यात येणार आहे.
नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी आताच खबरदारी घेणे आवश्यक आहे नाहीतर पुन्हा जग या विषाणूच्या विळख्यात आलं की लॉकडाउन शिवाय दुसरा पर्याय नसेल.
