चंद्रपूर - घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व चौकात चुली पेटवून हातावर भाकरी थापत थाळी वाजवून गॅस दरवाढी विरोधात "वाढलेला गॅस कोंडतोय सर्वसामान्यांचा श्वास! "धोरण मोदींचे मरण सर्वसामान्यांचे !
मोदीजी नहि चाहीये अच्छे दिन लौटा दो हमारे बुरे दिन !
"महंगा सिलेंडर महंगा तेल
मोदीजी आप सरकार चलाने मे हो गये फेल" असे नारे देत मोदी सरकारचा निषेध नोंदवविण्यात आला.
गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ ही गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे.
सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल ७० रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्यादेखील कमी आहे. दर महिन्याला सरकार ही दरवाढ करू लागले आहे. त्यामुळे दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने केली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, जेष्ठ नेते डी के आरिकर साहेब, निमेश मानकर, दिलीप रिगणे, जिल्हासचिव हर्षा खैरकर, जिल्हासहसचिव शोभा घरडे, शाहजादि अन्सारी, अर्चना बुटले, राणी रॉय, वाघमारे ताई, स्वेता रामटेके, सरस्वती गावनडे, नंदा शेरकी, सुमित्रा वैद्य, नीलिमा नरवडे, रेणुका पोगे, अर्चना कामटकर, कांता गौतरे, सुरेखा ठाकरे, शालिनी वैद्य, सारिका धोबे, भोयर ताई, भूमिका वैद्य, नंदा सोनवणे, बावणे ताई व महिला पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
