वर्धा - व्यवसायात झालेलं नुकसान आणि कर्ज यामुळे काहींनी शाखा व्यवस्थापकासह दरोडा टाकला.
ही घटना आहे वर्धा शहरातील मुथूट फायनान्स बँकेतील गुरुवारी काही अज्ञातांनी बँकेत प्रवेश करीत बंदूक व चाकूचा धाक दाखवीत सोनं व रोकड घेऊन पसार झाले होते.
वर्धा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असताना शाखा व्यवस्थापक महेश श्रीरंग याची चौकशी केली मात्र महेशने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली यावरून पोलिसांना त्याच्यावर संशय आला.
पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दरोडा केल्याची कबुली दिली.
या दरोड्यात त्याला सहकार्य करणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली, विशेष म्हणजे हे आरोपी बालपणीचे मित्र आहे.
पोलिसांनी त्यांच्याजवळून तब्बल अडीच किलो सोनं, सहा मोबाईल , पिस्टल व कार असा 4 कोटी 75 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या दरोड्याची योजना मागील 2 आठवड्यापासून सुरू होती, आरोपी पैकी काहीजणांना व्यवसायात आलेलं अपयश व कर्जबाजारीपणा याला कंटाळून हा गुन्हा घडविल्याच कबूल केलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा वर्धा पोलिसांनी 14 तासात समोर आणला.
