चंद्रपूर - चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी 17 डिसेंम्बरला मुंबई येथे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
चंद्रपुरातील प्रकल्पग्रस्तांच्या विरुगिरी आंदोलनांनंतर प्रकल्पग्रस्तांच शिष्टमंडळ आमदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली.
आमदार धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या निवेदनाची दखल घेत मुंबई येथे यासंदर्भात बैठक घेत प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी चर्चा करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त पैकी जे कुशल प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना करार पद्धतीने सेवेत घेऊन करार पद्धती अंतर्गत मानधन देण्यात यावे.
कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी विशेष जाहिरात देऊन पुढील प्रक्रियेस गती व प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी दहावी तसेच बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना परीक्षेसाठी विशेष प्रशिक्षण देत शालांत पात्रतेनुसार परीक्षेचे निकष तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावेळी दिले.
आमदार धानोरकर यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर योग्य विचार करून निर्णय घेत त्यांना न्याय देण्याची मागणी केली.
आयोजित बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाजेनको चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे आदी उपस्थित होते.
तब्बल 4 महिन्यांनी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत बैठक घेण्यास आमदार धानोरकर यांनी पुढाकार घेतला.
आयोजित बैठकीची सकारात्मकता बघून प्रकल्पग्रस्तांनी आमदार धानोरकरांचे आभार मानले.
