ताजी बातमी बीड - माजी आमदार पंकजा मुंडे यांच वर्चस्व असलेल्या वैधनाथ साखर कारखान्यातील चोरी प्रकरणात 4 जणाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी कांग्रेसच्या नगरसेविका यांचे पती अजीज इस्माईल शेख यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या अजीज शेख फरार आहे.
चोरट्यानी कारखान्यातील स्टोअर व वर्कशॉप मधून तब्बल 37 लाख 84 हजारांच साहित्य लंपास करण्यात आले होते.
17 ऑक्टोबर ला झालेल्या चोरीची तक्रार 22 डिसेंम्बरला परळी पोलीस स्टेशनला करण्यात आली होती.
चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणात 22 डिसेंबर रोजी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा तपासाला सुरुवात केली. त्यानंतर अखेर पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.
