चंद्रपूर - म्हणतात न मनात आत्मविश्वास, जिद्द असली की नशीब ही हरते असच एका जिद्दीच जिवंत उदाहरण चंद्रपुरातील एका मुलीचं आहे.
शहरातील उर्जानगर भागात राहणारी कोमल झटाले नामक मुलीने मिस इंडिया ग्लोब 2020 या सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
20 डिसेंम्बरला दिल्ली येथे रेसविंगस प्रोडक्शन हाऊस च्या वतीने पार पडलेल्या मिस्टर, मिस व मिसेस इंडिया ग्लोब 2020 स्पर्धेत कोमलने प्रथम क्रमांक पटकावीत चंद्रपूर जिल्ह्याचं नावलौकिक केलं.
कोमल ही सध्या एमबीबीएस चा अभ्यास करीत असून तिला मॉडेलिंग क्षेत्रात जाण्याची ईच्छा होती मात्र 4 वर्षाआधी कोमल चा भीषण अपघात झाला त्या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली त्या आजारातून कोमलने स्वतःला सावरलं मात्र तिला चालायला खूप त्रास होत होता.
अपघातानंतर मॉडेलिंग क्षेत्रात तिला संधी मिळणार की नाही हा विचार तिच्या मनात नेहमी यायचा मात्र तिने मेहनत व जिद्द न सोडता सगळ्या अडचणींवर मात करीत नागपूर येथील वन डायरेक्शन मॉडेलिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेत मॉडेलिंगची शिक्षा घेतली.
2020 च्या मिस इंडिया ग्लोब स्पर्धेत ऑनलाईन सहभाग घेतला त्यामध्ये कोमल ची निवड झाली व अंतिम फेरीसाठी दिल्लीला गेली.
या स्पर्धेत कोमल ने मिस इंडिया ग्लोब चा पुरस्कार पटकावीत बेस्ट कॅटवॉक, आणि मिस फोटोजेनिक सबटायटल सुद्धा आपल्या नावी केलं.
मिस इंडिया ग्लोब स्पर्धेत बिग बॉस फेम विवेक मिश्रा, एमटीव्ही फेम सागर आनंद, नितीन आहुजा, नेहा कला, काफील अहमद, टॉलीवूड अभिनेत्री ट्विनकल कपूर उपस्थित होत्या.
कोमल झटाले यांनी आपल्या यशाचं श्रेय मॉडेलिंग गुरू इम्रान शेख, पायल शाहू , बाबा विजय झटाले, आई ज्योत्स्ना झटाले, बहीण मोना यांना दिले.
कोमलला भविष्यात फेमिना मिस इंडिया स्पर्धेत विजय मिळवीत देशाचं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे.
