चंद्रपूर - भारतीय जनता पार्टी महानगर,विधी प्रकोष्ठ तर्फे कवी प्रा ज्ञानेश (ज्ञानेश्वर) लक्ष्मण वाकुडकर यांचे विरोधात भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी बाजपेयीं यांचा अपमान केल्या प्रकरणी चंद्रपुर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्रा.वाकुडकर यांच्या अश्या लिखाणामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत,असे स्पष्ठ करीत प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करा,अशी मागणी महानगर भाजपा तर्फे बुधवार २० जानेवारीला करण्यात आली आहे. Formar Prime minister Late Atal bihari Vajpayee insult
भाजपा महानगर विधी प्रकोष्ठ अध्यक्ष ऍड. हरीश मंचलवार यांनी ही तक्रार दाखल केली असून यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री रवींद्र गुरनुले,उपाध्यक्ष ऍड सुरेश तालेवार,भाजपा विधी प्रकोष्ठचे ऍड किरण पाल,ऍड अमोल वैद्य,ऍड राजेश जुनारकर,ऍड मनोज मिश्रा यांची उपस्थिती होती.प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी १६ जानेवारीच्या ऐका प्रसिद्ध दैनिकात ...तर मुंडेंचे मंत्रिपद व बाजपेयींचे भारतरत्न दोन्ही काढून घ्या या मथळ्याखाली एक वृत्त प्रकाशित केले. यात माजी पंतप्रधान स्व अटलबिहारी वाजपेयी यांचा अपमान करणारे वक्तव्य प्रा. वाकुडकर यांनी केले.हेच नाहीतर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याला व्हायरल करण्याचा प्रताप त्यांनी केला.या प्रकारामुळे समस्त भाजपा कार्यकर्ते व भाजपाप्रेमींच्या भावना दुखावल्या असून प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांचे विरुद्ध आयटीआय २००० च्या कलम ६६ (इ)प्रमाणे सायबर गुन्हा तसेच भा.द.वि ५०४,५००, ३४ 534 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. News34 Chandrapur
देशातील शांतता व सुव्यवस्था भंग करण्यासाठी, जनतेमध्ये फूट पाडण्याकरिता, करिता हे कृत्य प्राध्यापक वाकुडकर यांनी केले आहे. असाही आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.पोलीस प्रशासनाने यावर योग्य कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा महानगर भाजपाने दिला आहे.
