नागपूर - खोटी माहिती देऊन बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिका मिळविल्याने भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया अडचणीत आले असून याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने इमामवाडा व सक्करदारा पोलिसांना कलम 199, 200 व 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृहप्रकल्पामध्ये आमदारांनी खोटी माहिती देत सदनिका मिळविल्या न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणाचा कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहे.
किर्तीकुमार भांगडीया हे चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार आहे, त्यांचेवर नागपूर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
