ताजी बातमी - ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगात भीतीचे वातावरण पसरविले आहे, या कोरोनाच्या नव्या अवताराची एन्ट्री होऊ नये यासाठी अनेक देशांनी हवाई वाहतूक बंद केली मात्र या स्ट्रेनला येण्यापासून थांबवू शकले नाही.
भारतात 6 जण या नव्या स्ट्रेनचे संक्रमित आढळले आहे, देशातील विविध ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे.
कोरोनाचा नवा अवतार हा आधीपेक्षा 70 टक्के अधिक घातक आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ब्रिटनहून 33 हजार व्यक्ती देशात परतले त्यापैकी 114 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले या 114 नागरिकांमध्ये एकूण 6 जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला.
कोरोनाचा नवा स्ट्रेन 19 देशात पसरला आहे याचा प्रसार वेगात होत असून काही देशांनी लॉकडाउन जाहीर केले.
कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाची तीन प्रमुख लक्षण आढळून आली आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, वास न येणे याचा समावेश आहे.
