चंद्रपूर - लोकनेते विकासपुरुष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुर बीजेपी डिजिटल होत असतानाच भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन नोंदणी करावी असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)देवराव भोंगळे व महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.
भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी बाजपेयी यांच्या ९५ व्या जयंतीचे औचित्य साधून २५ डिसेंबर २०२० ला अटल डिजिटल बीजेपी चंद्रपूर सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते बाबूपेठस्थित भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी स्टेडियम येथे अटलजींना आदरांजली अर्पण करून करण्यात आला.या अभियानातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जनतेची सेवा करण्याचे हे उत्तम माध्यम असू शकते व या मुळे वेळेचा अपव्यय होणार नाही,असा उद्देश या उपक्रमाचा असल्याचे आ मुनगंटीवार यांनी शुभारंभ प्रसंगी स्पष्ट केले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील व लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक पदाधिकारी,कार्यकर्ते व भाजपा प्रेमींनी यात सहभाग घेऊन आपली नोंदणी ataldigitalchandrapur. com या संकेत स्थळावर केल्यास पक्षश्रेष्ठी व पदाधिकाऱ्यांना जनतेशी सुसंवाद साधता येऊन प्रश्न सोडविता येणार आहे.
नोंदणी करीता काही तांत्रिक अडचण होत असल्यास अनिरुद्ध भालेराव यांचेशी 9822658622 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून माध्यम संपर्क प्रमुख प्रशांत विघ्नेश्वर व श्रीकांत मल्लूझवार यांनी दिली आहे.