चंद्रपूर - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे जगातील सगळ्यात मोठे छात्र संघठण आहे हे आपण जाणताच परिषदेच्या संघटनात्मक, आंदोलनात्मक, गुणात्मक, गोष्टीमुळे आपल्या सर्वांशी सुपरिचित आहातच.
येत्या 25 व 26 डिसेंबरला नागपूर येथे ABVP चे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होणार आहे यावेळी 25 डिसेंबरला संपूर्ण भारतातल्या जिल्हा व नगर स्तरावर प्रत्यक्ष व आभासी पद्धतीने पण संपन्न होणार आहे.
अभाविपचे राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे लघु भारतचे दर्शन घडते व अनुभवायला मिळते. संपूर्ण भारतातले कार्यकर्ते व शैक्षणिक परिवार या ठिकाणी येतो.
या राष्ट्रीय अधिवेशनात ABVP चे संस्थापक अध्यक्ष प्रा. यशवंतराव केळकर राष्ट्रीय युवा पुरस्कार 2020 हा मनीष कुमार (Back to Village) या प्रकल्पाकरिता मिळाला आहे. मनीष कुमार हे वैशाली, बिहार येथील राहणार असून सेंद्रिय शेतीवर याचे संशोधन कार्य सुरू आहे.
या दोन दिवसीय अधिवेशनात विविध सत्र चालणार आहे. यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020), COVID PANDEMIC काळ, देशातील सामाजिक विषयावर, प्रस्ताव, चर्चा, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष, महामंत्री, व कार्यकारणी घोषणा होणार आहे.
तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ५ ठिकाणी ऑनलाइन अधिवेशन होणार आहे. व ८ स्थानावरून विद्यार्थी कार्यकर्ते समाजातील गणमान्य व्यक्तीगन उपस्थित राहणार आहे जिल्ह्यातील एकूण 350 चे वर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे
व जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शैक्षणिक व व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित रहावे असे आवाहन अभावीप चंद्रपूर चे जिल्हावासीयांना केले आहे. यावेळी अभाविप प्रांताध्यक्ष प्रा.योगेश येणारकर, महानगर उपाध्यक्ष प्रा.योगिनी देगमवार, जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, महानगरमंत्री शुभम निंबाळकर, सहमंत्री शैलेश दिंडेवार, जिल्हा अधिवेशन प्रमुख ऋषिकेश बनकर, अनिकेत अंदरस्कर यावेळी उपस्थित होते.
