ताजी बातमी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या वर्ग 10 वी चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून शाळांना www.mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन पुढची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने 23 डिसेंम्बर ते 11 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज भरायचा आहे तसेच पुनर्परिक्षार्थी व खाजगी विद्यार्थ्यांना 12 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहे.
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शासनाने परीक्षा पुढे ढकलल्या होत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या 12वी च्या परीक्षा एप्रिल व 10वी च्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा विचार सुरू आहे.
