News34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा द्वारे आयोजित ६८ व्या कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत कामगार कल्याण केंद्र ललित कला भवन चंद्रपुरचे इरफान मुजावर लिखित वृंदावन हे नाटक राज्यातून दूसरा क्रमांक पटकावत ६ पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे. Workers State Theater Competition
विक्रोळी मुंबई येथे कामगार राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच संपन्न झाली. वृंदावन या नाटकाला अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट सांघिक प्रयोग द्वितीय , सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन तृतीय बकुळ धवने , सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना द्वितीय हेमंत गुहे , स्त्री अभिनय तृतीय बकुळ धवने, सर्वोत्कृष्ट नेपथ्य तृतीय तेजराज चिकटवार - पंकज नवघरे , सर्वोत्कृष्ट संगीत तृतीय लिलेश बरदाळकर अशी एकूण सहा पारितोषिके जाहिर झाली आहेत.
या नाटकाची रंगभूषा - वेशभूषा मेघना शिंगरु यांची आहे. या नाटकात नूतन धवने , बबिता उइके , रोहिणी उइके , बकुळ धवने , पंकज मालिक , तुषार चहारे , मानसी उइके , वैशाख रामटेके , आरती राजगडकर , सौ परिणय वासेकर , हर्षरिका बैनर्जी , माधुरी गजपुरे , आशा बैनर्जी , समृद्धि काम्बळे, अंकुश राजुरकर , रविन्द्र वांढरे आदिंच्या प्रमुख भूमिका आहेत. वृंदावन हे नाटक सांस्कृतिक कार्य विभागा द्वारे आयोजित ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम आले असून नाशिक येथे होणाऱ्या अंतिम फेरीत देखील सादर होणार आहे. Drama
कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरितील वृंदावनच्या चमुच्या यशाबददल कामगार कल्याण अधिकारी श्री रामेश्वर अळणे , केन्द्रप्रमुख श्रीमती छाया गिरडकर आदिंनी अभिनंदन केले आहे. Maharashtra Labor Welfare Board