News34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई - राज्यात एकीकडे जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे तर दुसरीकडे मात्र राजपात्रित अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या अजब मागणीचे पत्र दिले आहे.
आज राज्याला अनेक शासकीय विभागात भ्रष्टाचाराचा विळखा लागला आहे, अनेक उच्चपदस्थ अधिकारी लाचखोरीत पकडल्या गेले, मात्र या राजपात्रित अधिकाऱ्यांनी आम्हाला किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना लाचखोरीच्या गुन्ह्यात पकडल्या गेलं तर आमची ओळख गुप्त ठेवा अशी मागणी केली आहे.
शासकीय अधिकाऱ्यांच्या या मागणीची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली असून त्यांच्या मागणीवर शासन काय निर्णय घेणार हा मोठा प्रश्न आहे.
नेमकी मागणी काय?
लाचखोर म्हणून पकडलं तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांची ओळख गुप्त ठेवा, अशी अजब मागणी महाराष्ट्र राज्य राजपात्रित अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांनी आपल्या मागणीचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.