News34 chandrapur
चंद्रपूर - 4 मार्चला चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील स्टेडियम जवळ MI कंपनीच्या मोबाईल चा स्फोट झाल्याची घटना घडली.
सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही मात्र मोबाईलच्या स्फोटामुळे दुचाकी वाहनाचे नुकसान झाले. Mobile blast in chandrapur
विठ्ठल मंदिर वार्डातील अशोक अंबिरवार यांचा MI कंपनीचा मोबाईल पाण्याने ओला झाला होता, बॅटरी सुद्धा काही प्रमाणात फुगली असल्याने अंबिरवार यांनी मोबाईल दुचाकीवर वाळविण्यासाठी बाहेर ठेवण्यात आला होता, मात्र काही क्षणात मोबाईल चा जोरदार स्फोट झाला.
Mi mobile phone blast
अचानक झालेल्या या स्फोटाच्या आवाजाने विठ्ठल मंदिर परिसर दणाणून गेला.
या स्फोटामुळे अंबिरवार यांचे दुचाकी वाहन Mh34Y3343 चे काही प्रमाणात नुकसान झाले.
काही दिवसांपूर्वी एका मोबाईल स्फोटामुळे वृद्धाला प्राण गमवावे लागले होते, अश्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी.