News34 chandrapur
चंद्रपूर : सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले असून या फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन 11 मार्च ला चंद्रपुरात करण्यात आले.
International film festival in chandrapur
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 13 मार्च 2023 या तीन दिवसात चंद्रपूर येथील मिराज सिनेमा, एम.डी.आर. मॉल येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 11 मार्च रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे रीतसर उदघाटन करण्यात आले. ‘पंचक’ या मराठी चित्रपटाने फिल्म फेस्टिवलचा आगाज करण्यात आला. यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) आमदार किशोर जोरगेवार, सपना मुनगंटीवार, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थिती होती. Sudhir mungantiwar
स्थानिक भाषेतील चित्रपटांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांची निर्मिती कशी होते. ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात येणारे चित्रपटांचे विषय, त्यामागची प्रेरणा, त्याची मांडणी या सर्व बाबींची ओळख होऊन आपल्या भुमीतही फिल्म साक्षरता निर्माण व्हावी, हा या फेस्टिवलचा प्रमुख उद्देश आहे. तीन दिवसात देशी चित्रपटांसोबतच विदेशी चित्रपटांचीसुध्दा पर्वणी चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे. Biggest announcement
उदघाटन कार्यक्रम झाल्यावर सांस्कृतिक कार्य मंत्री, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदा महापुरुष, महामानव यांच्यावर चित्रपटांची निर्मिती करणार्यांना तब्बल 5 कोटी रुपयांचे अनुदान घोषित केले असल्याचे सांगत महिला दिग्दर्शकाना 5 लाखांचे वाढीव अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यातील चित्रपटसृष्टीत वर्ष 1971 नंतर अनेक सुपरहिट, गोल्डन जुब्लि चित्रपटाची निर्मिती ही मराठी सिनेमातून झाली होती आणि तो वारसा दादासाहेब फाळके, दादा कोंडके यांनी जपला.
चित्रपटसृष्टीत मराठी माणूस काय करू शकतो हे दादा कोंडके यांनी सिद्ध केले, आपल्यामध्ये इच्छाशक्ती भरपूर आहे, पुढे सुद्धा मराठी चित्रपटाला वेगळे स्थान मिळावे यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहू.
सध्या कोल्हापूर फिल्म नगरी, मुंबई फिल्म सिटी आपण आधुनिक करीत आहो, युनिव्हर्सल, फॉक्स स्टार व डिजनी लँड सारख्या मोठ्या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या स्टुडिओ सह आपली चर्चा सुरू आहे, त्या धर्तीवर मुंबई फिल्म नगरी जगातली मोठी फिल्मनगरी तयार करू यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे.
चंद्रपूर फिल्म फेस्टिव्हल चे आयोजन सध्या घाईत झाले मात्र पुढच्या वेळी सदर फिल्म फेस्टिव्हलचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर केले जाणार, या फेस्टिव्हलमध्ये यंदा विविध भाषिक चित्रपटांची मेजवानी चंद्रपूरकरांना मिळणार आहे, भाषेचा जो अभाव होता तो सब टाईटल मुळे दूर झाला आहे.
यावेळी मुनगंटीवार यांनी महत्वाची घोषणा करीत मिशन शौर्य अंतर्गत चंद्रपुरातील तरुण व तरुणीं जे सुपरहिट नाटक आपल्या अभिनयातून गाजवितात मात्र त्यांना पुढे चांगली संधी मिळत नाही त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी म्हणून बॉलीवूड चे प्रसिद्ध निर्देशक सुभाष घई यांच्यासोबत महत्वाची चर्चा करण्यात आली असून ते 3 दिवसांसाठी चंद्रपूरला येणार व आपल्या जिल्ह्यातील झाडीपट्टी व अनेक नाटके गाजविणाऱ्या तरुण तरुणीचे अभिनय बघून त्यांना पुढचे प्रशिक्षण सुभाष घई अकॅडमी मध्ये प्रवेश करीत दिल्या जाणार आहे, त्यामाध्यमातून आपले तरुण व तरुणी चित्रपट सृष्टी मध्ये सांस्कृतिक मंत्रालयातर्फे विदर्भाचे नाव मोठे करण्याचं काम करणार.
सोबतच यंदा चं वर्ष हे शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे, राज्यात राज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येणार असून राज्यात तब्बल 100 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात जाणता राजा चे आयोजन व बॉलिवूड चे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती या टीव्ही शो च्या धर्तीवर सुद्धा अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या फिल्म फेस्टिव्हल मध्ये 12 आणि 13 मार्च ला प्रत्येकी आठ-आठ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. अशाप्रकारे एकूण 17 देशी – विदेशी चित्रपटांची रेलचेल चंद्रपुरात राहणार आहे. 17 चित्रपटांमध्ये सहा भारतीय चित्रपट आहेत. यात पंचक, मदार आणि टेरीटरी या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. टेरीटरी हा मराठी चित्रपट वाघांच्या अधिवासावर आधारीत असून चंद्रपूर येथील सचिन मुल्यमवार व स्थानिकांनी हा चित्रपट बनविला आहे.
इतर तीन भारतीय चित्रपटांमध्ये निहारीका (बंगाली), टोरांज हजबंड (आसामी) आणि बिगीनिंग (तामीळ) यांचा समावेश आहे. तर विदेशी चित्रपटांमध्ये जर्मनी, फ्रान्स, कतार, चिली, अर्जेंटिना, पॅलेस्टाईन, कॅनडा, बेल्जीयम, डेन्मार्क आणि इराण या देशातील चित्रपट त्यांच्या मूळ भाषेत आणि इंग्रजी भाषेसह दाखविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील चित्रपट प्रेमींनी तीन दिवसीय फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.