News34 chandrapur
चंद्रपूर - जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीणाऱ्या- वीजयंत्रणेत अदृश्य असलेल्या व प्रगतीची बीजे पेरणारया ' विजेला ' सुरळीत ठेवण्यासाठी विजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी, अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीजक्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून देशभरात तदवतच महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलातील सर्व २९ उपविभागात साजरा करण्यात आला. आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वांना वीजसुरक्षेची शपथ देण्यात आली.
मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी सर्वांना लाईनमॅन दिनाच्या शुभेच्छा देत,-"महावितरण चे -'लाईनमन' हे महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहेत, हे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास वर्षाचे ३६५ दिवस अविरत सेवा देतात.
कधी चंद्रपूरच्या कडकडते उन्ह अंगावर झेलत तर पुरात पोहून जात, धो- धो पावसात कर्तव्य पार पाडतात. ढाण्या वाघाचे नंदनवन-चंद्रपूर जिल्ह्याच्या रानावनात तर गडचिरोली जिल्हा यासारख्या दुर्गम -आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत महावितरणचे 'आधारस्तंभ '-जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीतात याचा मला सार्थ अभिमान आहे, "असे प्रतिपादन केले. Msedcl
कोरोना काळासारख्या कठीण काळात सर्वत्र संचारबंदी असतांना जीवाची पर्वा न करता 'तुम्ही 'आधारस्तंभानी - जनतेचे जीवन 'प्रकाशमय ' ठेवत त्यांचे जीवनमान त्या काळात सुसह्य केले पण आता काळजी घ्या व दुरुस्ती कामात सुरक्षेशी तडजोड करू नका. कारण तुमची वाट घरी तुमचा परिवार पाहत असतो तर, महावितरण साठी महावितरणचा तुम्ही महत्वाचा ' दुवा 'आहात असे मुख्य अभियंता म्हणाले. Line man
याप्रसंगी,विशेष कामगिरी करणारे वरिष्ठ तंत्रज्ञ विजेंद्र कोटनाके पुरोहित भिमटे यांचा प्रतिनिधिक - सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
याप्रसंगी, चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे, वरिष्ठ व्यवस्थापक(मा. सं.)श्री. सुशिल विखार, कार्य. अभियंता श्री. सुहास पडोळे, उप कार्य. अभियंता श्री. वसंत हेडाऊ, उपव्यवस्थापक(मा. सं.)श्री. योगेश गोरे, सहा. अभियंता सर्वश्री.- साहिल टाके, सुमेध खणके, मिथुन मेश्राम, टिकेश राऊत, पराग हलमारे, रितेश ढवळे, प्रवीण शेंडे, अतुल रोडगे व मोठया संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'लाईनमॅन', प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित, या 'लाईनमॅन-दिनी' उपविभाग १ अंतर्गत आपल्या सर्व लाडक्या अभियंते- वसंत हेडाऊ, साहिल टाके, सुमेध खणके, मिथुन मेश्राम, टिकेश राऊत, पराग हलमारे, रितेश ढवळे, प्रवीण शेंडे, अतुल रोडगे यांना भेटवस्तू देत 'लाईनमॅन' यांनी प्रेम व्यक्त केले. अधिकारी- कर्मचारी यांचेमधील ऋणानुबंध सर्वांनी अनुभवला व याचा अभिमान असल्याचा उल्लेख केल्या शिवाय मुख्य अभियंता यांना राहविले नाही व अशीच सकारात्मकता सर्वत्र नांदो अशी आशा प्रकट केली.
उपव्यवस्थापक(मा. सं.) योगेश गोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कनिष्ठ लिपिक विजय भैसारे यांनी केले.