News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुल नगरपरिषदेच्या वतीने महिलांच्या विविध कार्यक्रम विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मूल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर मूलच्या माजी नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर, माजी नगराध्यक्ष सुनीता चौधरी,रीना थेरकर , उषा शेंडे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम मूल नगर परिषदेच्या सर्व महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते.
गावातील नगर परिषद हद्दीत असलेल्या मोकळ्या भिंती काही शासकीय कार्यालयाच्या, ओपन स्पेस चे वाल कंपाऊंड या भिंती बोलक्या दिसाव्या आणि गावात स्वच्छता कशी राखता येईल, नागरिकाच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी स्वच्छतेबाबत संदेश देणारी चित्र काढण्यात आले. याकरिता मुल येथील मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी भित्ती चित्र स्पर्धा तर ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी म्याराथॉन स्पर्धा, थाळी फेक, गोळा फेक या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील चित्रकारांना व इतरही स्पर्धेत प्रथम, द्वितीय, व तृतीय स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. माजी महिला नगराध्यक्षांचे स्मुर्तीचींन्ह देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून नगर परिषदेच्या वतीने 2022 मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
दुपारी कन्नमवार सभागृहात नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते संसृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ.रत्नमाला भोयर यांचे अध्यक्षते खाली तर प्रकल्प अधिकारी रितेश भोयर, आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार, अभियंता श्रीकांत समर्थ, अखील बारापात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले. नगरातील महिलांनी मोठ्या संख्येने सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला. समूह नृत्य , नाटिका, गित गायन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. नृत्यातील प्रथम पारितोषिक, स्मार्ट ग्रुप, द्वितीय एरोनॉटिल ग्रुप, तृतीय नारीशक्ती ग्रुप, नातिकेत प्रथम सुशिक्षित बेरोजगार ग्रुप, द्वितीय कामगार ग्रुप, तृतीय आनंदी ,गुजन ग्रुप,गायन प्रथम कुमुदिनी भोयर, द्वितीय सौ.वारघांटीवार सर्वांना स्मुर्तीचीन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ.रागिणी आडपवार यांनी केले. मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.