News34 chandrapur
चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरामध्ये सध्या मद्यविक्री च्या दुकानाची चर्चा सर्वत्र पहायला मिळत आहे. एक महिना अगोदर येथील डॉ. पाझारे हॉस्पिटल चा परिसरात दारू विक्री चा नवीन दुकानाच्या विरोधात येथील महिलांनी आंदोलने करून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना निवेदने तसेच आंदोलने करण्यात आले होते.
Country liquor shop allowed
Country liquor shop allowed
तरी सुध्दा ही दुकाने सऱ्हासपणे खुले आहेत. अशातच त्याच्या काहीं अंतरावर असलेल्या आंबेडकर चौक येथे आणखी एक नवीन देशी दारू विक्री चे दुकान सुरू होत असल्याने येथील महिलांनी याचा विरोध करित आप चंद्रपूर कडे तक्रार केली. Addicted youth
ज्या ठिकाणी हे दारू चे दुकान आहे तिथे लागूनच राष्ट्रीय महामार्ग आहे. येथे कुठेच पार्किंग ची व्यवस्था नसल्याने तथा हे ठिकाण अपघातग्रस्त असताना, या ठिकाणी दारु चा दुकानाला परवानगी कशी काय देण्यात आली ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. A country liquor shop will be opened at Babupeth
त्यावरून आप चे शहर सचिव राजू कुडे यांचा नेतृत्वात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांना देशी दारू चे दुकान तात्काळ स्थलांतरीत करावे अन्यथा आम्ही येथील महिलांना सोबत घेऊन रस्त्यांवर उतरू अशी मागणी आप चे शहर सचिव राजू कुडे ने केली आहे. Aap chandrapur
यावेळेला आपचे शहर अध्यक्ष योगेश भाऊ गोखरे, सचिव राजु भाऊ कुडे, अनुप तेलतुंबडे, अजय बाथव, स्वप्नील घागरगुंडे, प्रशांत रामटेके तथा इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपास्थित होते..