News34 chandrapur
चंद्रपूर - मागील अनेक महिन्यापासून माजी नगरसेवक बलराम दोडाणी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूने अनेक वर्षापूर्वी बंद केलेला गेट पुन्हा सुरू करावा अशी मागणी करीत आहे. Gmc chandrapur
सदर गेट सुरू व्हावा यासाठी दोडाणी सतत पाठपुरावा करीत आहे, त्यांनी पालकमंत्री, आमदार व खासदार, जिल्हाधिकारी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे यांना पत्र सुद्धा लिहले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
याबाबत अनेक बैठका घेण्यात आल्या मात्र सर्व बैठकीत अधिष्ठाता हे स्वतः उपस्थित न राहिल्याने गेट चा प्रश्न मार्गी लागला नाही. Chandrapur government medical college
चंद्रपूर शहरातील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे, साधा मोर्चा किंवा रॅली जरी शहरातून काढली तर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाते.
यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णवाहिका गर्दीत अडकल्या जात असल्याने अनेक गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका रुग्णाला वेळेवर उपचार मिळाला नसल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी डॉ. सोबत धक्काबुक्की केली होती. Emergency gate
रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी अधिष्ठाता व जनप्रतिनिधी काही एक प्रयत्न करताना दिसत नाही आहे.
रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी माजी नगरसेवक दोडाणी यांनी मागच्या बाजूला बंद केलेला गेट सुरू करावा जेणेकरून रुग्णवाहिका मागील बाजूने तात्काळ रुग्णालयात येणार, याचा फायदा अनेक जिल्ह्यातील नागरिकांना होणार मात्र सदर मागणीवर अधिष्ठाता दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दोडाणी यांनी केला आहे.
विशेष बाब म्हणजे ते गेट सुरू का करण्यात येत नाही यावर अधिष्ठाता यांनी अजब कारण सांगितले आहे, रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली होती, त्यामुळे सदर गेट सुरू करणे योग्य नाही असे उत्तर अधिष्ठाता यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना पत्राद्वारे दिले आहे.
तो आपत्कालीन मार्ग सुरू होणे व डॉक्टरांना मारहाण याचा आपसात काय संबंध? असा प्रश्न यावेळी दोडाणी यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर दुर्लक्ष, त्यांच्यावर रुग्णालयात चांगला उपचार होतो काय? याबाबत काही माहिती नसलेले अधिष्ठाता चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला लाभले आहे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्यात ती बाब उघडकीस आली होती.
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करीत प्रशासनाने तो आपत्कालीन मार्ग सुरू करावा अशी मागणी बलराम दोडाणी यांनी केली आहे.