News34 chandrapur
चंद्रपूर - उन्हाळा आला की वन्यप्राणी शहराकडे वाट धरतात, अशीच वाट चंद्रपूर शहरातील लालपेठ भागात अस्वलीने धरली आहे. Wildlife
मागील 2 ते 3 दिवसापासून शहरातील लालपेठ भागात असलेले वेकोलीमधील सब स्टेशन मध्ये रात्रीच्या सुमारास अस्वल मुक्त संचार करीत आहे.
विशेष म्हणजे या भागातील विद्युत सब स्टेशन परिसर हा जंगलाने व्याप्त असल्याने या भागात वन्यप्राणी यांचे दर्शन होत असते. Wild animals
विद्युत सब स्टेशन असल्याने वेकोली ने आजूबाजूला साधी भिंत सुद्धा निर्माण केली नसल्याने त्या जागी टिनाचे शेड लावण्यात आले आहे.
मात्र ही अस्वल टिनाचे शेड पाडून मागील 2 दिवसापासून सब स्टेशनच्या आत येत आहे,
विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी वेकोली स्थायी व्यवस्था करीत नसल्याने अस्वलीला मार्गक्रमण करणे सोपे होत आहे. Bear in chandrapur
वारंवार अस्वलीच्या मुक्त संचाराने वेकोली कर्मचारी दहशतीमध्ये आहे.