News34 chandrapur
चंद्रपूर : देशात सतत महागाईचा होणारा भडका बघता गृहिणींचे बजट बिघडून गेले आहे, महागाईचा होणारा भडका बघता सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, देशात बेरोजगारांची
लक्षणीय वाढ होत आहे, मात्र केंद्र सरकार सदर महागाई थांबविण्यात असमर्थ ठरत आहे. International woman's day
जगातील महिलांच्या सन्मानाचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन मात्र या दिनाला चंद्रपुरात वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे देशातील महागाईचा विरोध करण्यात येणार आज.
जगातील महिलांच्या सन्मानाचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन मात्र या दिनाला चंद्रपुरात वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे देशातील महागाईचा विरोध करण्यात येणार आज.
सिलिंडर दरवाढीमुळे महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे सिलिंडर दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसह महिलांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष तनुजा रायपुरे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. Chandrapur rally
सिलिंडर दरवाढ व खाद्यतेलाचे दर कमी करण्यात यावे, महिलांना सुरक्षित व सुलभ शौचालय शहराच्या मुख्य ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे, मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, गृहिणींची सरकारने नोंद घ्यायला पाहिजे, मुलींना संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याचे रायपुरे यांनी सांगितले. न्यू इंग्लिश हायस्कूल मैदानावरून दुपारी १ वाजता मोर्चा प्रारंभ होणार आहे. मोर्चात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. तनुजा रायपुरे मोर्चाचे नेतृत्व करतील.
Opposition to inflation
पत्रकार परिषदेला महानगर महासचिव मोनाली पाटील, जिल्हा सल्लागार लता साव, सुलभा चांदेकर, प्रज्ञा रामटेके आदी उपस्थित होते.