News34 chandrapur
चंद्रपूर - शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले. Highlights of Maharashtra Budget 2023
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अनेक योजनांची घोषणा केली आहे. Maharashtra Budget 2023 news
यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढविण्यात आली असून आधी या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंत उपचाराचा लाभ मिळत होता आता सरळ या योजनेत 5 लाखांची वाढ करण्यात आली आहे. नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत. Maharashtra Budget 2023 impact on economy
राज्यातील महिलाना एसटी बस प्रवासात तिकीट दरात 50 टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात असून यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ जन्मानंतर मुलीला 5000 रुपये, पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये, अकरावीत 8000 रुपये, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये. Maharashtra Budget 2023 healthcare
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यात 700 रुग्णालयाची स्थापना होणार, दवाखान्यात मोफत तपासणीचा नागरिकांना लाभ, रमाई आवास योजनते दीड लाख घरकुल, 25 हजार घरे मातंग समाजातील नागरिकांसाठी राखीव, धनगर समाजातील लाभार्थ्यांना 25 हजार घरे राखीव करण्यात आली आहे. निराधार योजनेमध्ये वाढीव अर्थसहाय्य, श्रावणबाळ योजनेत 1500 रुपये अर्थसहाय्य, असंघटित कामगार कल्याण मंडळाची स्थापना होणार, ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक मंडळ, नोकरदार महिलांसाठी 50 वस्तीगृहांच निर्माण करण्यात येणार आहे. Devendra Fadnavis's Vision for Maharashtra's Economy